वायव्य मुंबई: शिवसेना उद्धव ठाकरे गटासाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात अतिशय अटीतटीची लढत झाली. शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर आणि ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर यांच्यातील लढत अतिशय उत्कंठावर्धक झाली.
सुरुवातीला अमोल कीर्तीकर यांनी निर्णायक आघाडी घेत विजय मिळविला. मात्र नंतर वायकर यांनी फेरमतमोजणीची मागणी केली. त्यात वायकर यांना ४८ मतांनी विजयी घोषित करण्यात आले. रवींद्र वायकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांचे सुपुत्र अमोल यांच्यावर मिळवलेला विजय शिंदे गटासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. फेरमतमोजणीनंतर रवींद्र वायकर याना ४ लाख ५२ हजार ६४४ मते मिळाली. तर अमोल कीर्तीकर याना ४ लाख ५२ हजार ५९६ मते मिळाली. संध्याकाळी अमोल कीर्तीकर हे विजयाच्या उंबरठ्यावर असताना रवींद्र वायकर यांनी पुनर्मोजणीची मागणी केली, तर पुन्हा अमोल कीर्तीकर यांनी पुनर्मोजणीची मागणी केली होती.