मुंबई : शिवसेना (उबाठा) नेते व मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांची ‘ईडी’ने सोमवारी आठ तास चौकशी केली.
‘ईडी’ने बजावलेले पहिले समन्स कीर्तीकर यांनी टाळले होते. त्यानंतर ‘ईडी’ने त्यांना ८ एप्रिल रोजी हजर राहण्यास सांगितले होते. कोविड काळात स्थलांतरित मजुरांना ‘खिचडी’ पुरवण्याचे कंत्राट देताना गैरप्रकार झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. २०२० मध्ये महाविकास आघाडीचे सरकार असताना हा गैरव्यवहार झाला होता.
६.३७ कोटी रुपयांच्या खिचडी वाटप घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सुजीत पाटकर, खासदार संजय राऊत व मुंबई मनपाच्या काही अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता.