
मागील वर्षी जून महिन्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्व अमान्य करत बंडखोरी केली. यानंतर शिंदे यांनी भाजपसोबत हातमीळवणी करत सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची तर तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.
यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपला गट हाच खरी शिवसेना असल्याला दावा केला. आता खरी शिवसेना कोणती? हा मोठा प्रश्न पडला आहे. यासाठीच आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांचे गट एकमेकांसमोर उभे राहिले आहेत. दोघेही आपली बाजू जनतेसमोर मांडत आहेत. एकनाथ शिंदे गटानं सांगितलं आहे की, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा पुढे घेऊन जाणार आहोत. तर उद्धव ठाकरेंचा गट सांगत आहे की, शिवसेनेवर आमचा दावा आहे. या सगळ्यानंतर शिवसेनेचे नाव आणि पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण याबद्दल उद्धव गट आणि शिंद गटानं निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती.
निवडणूक आयोगानं शिवसेनाचा पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं आहे. या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर ३१ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार होती मात्र. त्या दिवशी इलेक्ट्रोल बाँड बाबत दिवसभर सुनावणी होणार होती. त्यामुळे ती तारीख पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान आता याचिकेवर दिवाळीनंतर सुनावणी होणार आहे. दिवाळीच्या सुट्यानंतर २० नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. या प्रकरणी अनेक महिन्यांपासून सुनावणी झाली नव्हती. आता २० तारखेला तरी सुनावणी होणार की दुसरी तारीख मिळणार हे पाहण महत्वाचं आहे. याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून आहे.