शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू थोडक्यात बचावले

सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नसून ते सुखरुप आहेत.
शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू थोडक्यात बचावले

काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, ओक्केमधी हाय सगळं’ असे म्हणणारे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील थोडक्यात बचावले आहेत. शहाजीबापू पाटील यांच्या मुंबईतील आमदार निवासातील खोलीचे छप्पर बुधवारी रात्री कोसळले. जेव्हा ही घटना घडली, तेव्हा शहाजीबापू खोलीमध्येच होते. पण, सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नसून ते सुखरुप आहेत.

दक्षिण मुंबईत मंत्रालयाजवळच्या आकाशवाणी आमदार निवासात शहाजीबापू पाटील यांची खोली आहे. बुधवारी रात्री आमदार निवासात आल्यानंतर ते आपल्या खोलीत विश्रांतीसाठी गेले. तेव्हा दरवाजा उघडून खोलीत प्रवेश करताच छताचा काही भाग खाली कोसळला. सुदैवाने ते या घटनेत थोडक्यात वाचले. छताचा काही भाग हा शहाजीबापू यांच्या बेडवरच कोसळला. या दुर्घटनेतून ते थोडक्यात बचावले. त्यानंतर आमदार निवासात त्यांच्यासाठी दुसऱ्या खोलीचा बंदोबस्त करावा लागला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in