ड्रीम ११ चषक स्पर्धेत शिवसेवा स्पोर्ट्स क्लब संघ ठरला विजेता

ड्रीम ११ चषक स्पर्धेत शिवसेवा स्पोर्ट्स क्लब संघ ठरला विजेता
Published on

दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनच्या वतीने ओव्हल मैदान येथे आयोजित केलेल्या ड्रीम ११ चषक या १२ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत शिवसेवा स्पोर्ट्स क्लब संघ विजेता ठरला.

अंतिम फेरीच्या लढतीत त्यांनी प्रो वर्ल्ड टॅलेंट क्रिकेट अकादमी संघावर १६ धावांनी विजय मिळवून प्रथमच या स्पर्धेत विजेतेपदाचा मान मिळविला. भारतीय हॉकी संघाला ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून देणारे कर्णधार एम. एम. सोमय्या यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. तत्पूर्वी, शिवसेवा स्पोर्ट्स क्लब संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत २ बाद १४८ धावांची मजल मारली. प्रो वर्ल्ड टॅलेंट क्रिकेट अकादमीला २० षटकांत ७ बाद १३२ धावाच करता आल्या. नाबाद ३५ धावा आणि मोक्याच्या क्षणी दोन प्रतिस्पर्धी फलंदाजांना धावचीत करणारा सैफ अली याला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.

संक्षिप्त धावफलक : शिवसेवा स्पोर्ट्स क्लब - २० ओव्हर्समध्ये २ बाद १४८ ( श्रेयांस सावंत 22, अरहम ३९, प्रवीर सिंग नाबाद ३६, सैफ अली नाबाद ३५) वि. वि. प्रो वर्ल्ड टॅलेंट क्रिकेट अकादमी : २० ओव्हर्समध्ये ७ बाद १३२ ( हर्ष ५९, आर्यन देसाई २२, अर्णव तिवारी १३; अर्जुन दादरकर १५/२) सामनावीर - सैफ अली .

logo
marathi.freepressjournal.in