
शिवसेनेच्या स्थानपनेपासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे दादरच्या शिवाजीपार्क मैदानावर दसरा मेळावा घेत होते. त्यानंतर शिवसेनेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ती परंपरा पुढे अखंडपणे सुरु ठेवली. शिवाजी पार्क मैदानावरील दसरा मेळाव्याकडे राज्यभरातील शिवसैनिकाचं लक्ष असतं. शिवसैनिकाचं भावनिक नातं दसरा मेळाव्याशी तयार झालं आहे. त्यानंतर शिवसेनेत फुट पडून एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेवर दावा सांगितला. यानंतर मात्र शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष सुरु झाला. दरम्यान, यंदाचा दसरा मेळावा कोण घेणार याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं. ठाकरे आणि शिंदे गट दोन्हीनी दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळाव्या घेण्यासाठी अर्ज दाखल केले होते. दरम्यान, आता शिंदे गटाने शिवाजी पार्क मैदानावरील आपला दावा सोडला आहे.
मुंबई महापालिकेकडे शिंगे गटानं शिवाजी पार्क मैदानावर सभा घेण्यासाठी केलेला अर्ज मागे घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. सदा सरवणकर यांनी मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनंतर स्वत: मुंबई महापालिकेच्या कार्यालयात जाऊन अर्ज मागे घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिंगे गटाने आपापसातील संघर्ष टाळण्यासाठी एक पाऊल मागे घेण्याचं ठरवलं आहे. शिंदे गट शिवाजी पार्क मैदानाऐवजी दसरा मेळाव्यासाठी अन्य मैदानांच्या पर्यायांचा विचार करणार असल्याचं देखील दसा सरवणकर यांनी सांगितलं. त्यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबाबतची पोस्ट करत माहिती दिली आहे.
शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची सभा ही शिवाजी पार्क मैदानाऐवजी दक्षिण मुंबईतील क्रॉस मैदान किंवा ओव्हल ग्राउंडवर घेण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. त्याच बरोबर शिंदे गटाकडून इतर मैदानांची देखील चाचपणी सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. सदा सरवणकर यांनी पोस्ट केल्यानंतर तसंच दीपक केसरकर यांनी माहिती दिल्यानंतर शिंदे गटाने माघार घेतली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. दरम्यान, मुंबई महापालिकेकडून शिवाजी पार्क मैदानाबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे शिंगे गटाने माघार घेतली असली तरी ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार का? हा तिढा मात्र कायम आहे.