तणावमुक्त जीवन जगण्याचा संदेश; दादरच्या शिवाजी पार्क विघ्नहर्ता गणेश मंडळाचा देखावा

धावपळीच्या जीवनात प्रत्येक जण तणावाखाली जीवन जगत आहेत. अभ्यासाचा ताण, लहान मुलेही तणावात जगतात.
तणावमुक्त जीवन जगण्याचा संदेश; दादरच्या शिवाजी पार्क विघ्नहर्ता गणेश मंडळाचा देखावा
(Photo - Insta/shivajiparkchavighnaharta)
Published on

मुंबई : धावपळीच्या जीवनात प्रत्येक जण तणावाखाली जीवन जगत आहेत. अभ्यासाचा ताण, लहान मुलेही तणावात जगतात.

'आरोग्याकडे दुर्लक्ष तर तितकाच शरीराला त्रास' या विषयाला अनुसरून दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क विघ्नहर्ता गणेश मंडळांच्या वतीने 'व्हा क्रिएटिव्ह व्हा ॲक्टिव्ह' हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

प्रत्येक माणूस हा रोजच लहान-मोठ्या तणावाला सामोरा जात आहे. त्यात लहान मुलेही तितकेच तणावग्रस्त जीवन जगत आहेत.

प्रमाणापेक्षा जास्त शाळेतील अभ्यासाचा ताण, मोबाईलच्या अति वापरामुळे शारिरीक आणि मानसिक त्रासाला ही लहान मुले बळी पडत आहेत. रोज त्याच त्याच गोष्टी, तेच तेच विचार यामुळे तर्कशुद्ध विचार, भाषा, अनुशासन, क्रमबद्धता याचा विकास कुठेतरी थांबला जात आहे. आपल्या शरीराचा होणारा हा हास दिवसेंदिवस वाढतच जात आहे. तो भरून काढणे फार गरजेचे असून या सगळ्यावर उपाय म्हणजे 'लेफ्ट ब्रेन थेरेपी'. लेफ्ट ब्रेन थेरेपी ही एक मानसिक, वैचारिक आणि मेंदूच्या विशिष्ट भागाशी संबधित थेरपी आहे, जी माणसाच्या विचारशक्ती, तार्किकता, विश्लेषणात्मक क्षमता आणि भाषेच्या कौशल्यावर लक्ष केंद्रीत होते. ही थेरपी डाव्या मेंदूचे कार्य सुधारते. याच सगळ्याचा विचार करून आपल्या आयुष्याशी निगडीत असणारा पण तितकाच दुर्लक्षित विषय अपल्या समोर गणपतीच्या सजावटीत आणल्याची माहिती शिवाजी पार्कचा विघ्नहर्ता गणेश मंडळाचे कला दिग्दर्शक सुमित पाटील यांनी 'दैनिक नवशक्ति' ला दिली.

आकार जोडून त्यातून तयार होणाऱ्या चित्रातील व्यक्ती आपल्या आयुष्यात किती महत्त्वाच्या आहेत हे समजून घेणे, उदा. सफाई कामगार, शेतकरी, ड्रायव्हर, शिक्षक हे नसतील तर आपली बरीच कामे थांबू शकतात. इथे एका चौकोनात फार वेगवेगळे आकार आहेत.

शालोपयोगी वस्तूंचे वाटप!

शिवाजी पार्क गणेशोत्सव मंडळाला भेट देणाऱ्या गरीब, गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी शालेय वस्तूंचे वाटप केले जाते. यंदाही हा उपक्रम राबवला जात असल्याचे मंडळातर्फे सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in