शिवडी-न्हावाशेवा पुलामुळे कॉटन ग्रीन येथे वाहतूककोंडीची शक्यता; ठाकरेंच्या शिवसेनेचे एमएमआरडीएला पत्र

शिवडी-न्हावाशेवा सेतू लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. परंतु या ठिकाणी कॉटनग्रीन फायर स्टेशन शेजारीच बीपीटीची पे ॲण्ड पार्किंग जागा आहेत.
शिवडी-न्हावाशेवा पुलामुळे कॉटन ग्रीन येथे वाहतूककोंडीची शक्यता; ठाकरेंच्या शिवसेनेचे एमएमआरडीएला पत्र

मुंबई : शिवडी कॉटनग्रीन प्रभाग क्रमांक २०६ मध्ये शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूचे लवकरच लोकार्पण होणार आहे. या सेतूवरून येणारी वाहने ही शिवडी गाडीअड्डा ते कॉटनग्रीन फायर स्टेशन या ठिकाणाहून मार्गस्थ होणार आहेत. परंतु झकेरिया बंदर रोड, नाथ पै मार्ग, दत्ताराम लाड मार्ग या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे पे ॲण्ड पार्कच्या गाड्यांसाठी पर्याय द्या, असे पत्र एमएमआरडीएला दिल्याचे ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी सांगितले.

शिवडी-न्हावाशेवा सेतू लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. परंतु या ठिकाणी कॉटनग्रीन फायर स्टेशन शेजारीच बीपीटीची पे ॲण्ड पार्किंग जागा आहेत. या पार्किंगमध्ये दररोज हजारो वाहने पार्किंगसाठी ये-जा सुरू असते. दोन्ही ठिकाणाहून अधिक प्रमाणात गाड्यांचा प्रवाह वाढल्यास झकेरिया बंदर रोड, नाथ पै मार्ग, दत्ताराम लाड मार्ग या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीची समस्या उद्भवू शकते. बीपीटीमध्ये पार्किंगसाठी येणाऱ्या गाड्यांना जर रे रोडवरून ये-जा करण्याची व्यवस्था करून देण्यात आली किंवा कॉटनग्रीन फायर स्टेशन येथून फक्त शिवडी-न्हावाशेवा ब्रिजवर जाणाऱ्या गाड्यांना प्रवेश दिला तर भविष्यात मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूककोंडीची समस्या दूर होईल. त्यामुळे मुंबई पोर्ट ट्रस्टचे असलेल्या पे ॲण्ड पार्क पार्किंगसाठी ये-जा करणाऱ्या गाड्यांसाठी मार्ग काढावा, अशी सूचना पडवळ यांनी पत्राद्वारे केली.

निवडणुकीनंतर टोल वाढ!

न्हावाशेवा लिंक रोडचा टोल २५० रुपये निश्चित करण्यात आला आहे. एकीकडे २,२०० कोटी कंत्राटदारांना अधिक देण्यात येत आहे आणि दुसरीकडे टोलचा मार नागरिकांना सहन करावा लागत आहे. निवडणूक असल्याने टोल शुल्क कमी आहे. निवडणुकीनंतर टोलवाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in