शिवडीत साकारणार कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराची प्रतिकृती

श्री महालक्ष्मी सार्वजनिक दीपोत्सव मंडळ यंदा हिरक महोत्सवी वर्ष साजरे करत आहे.
शिवडीत साकारणार कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराची प्रतिकृती
Published on

मुंबई : मुंबईत दिवाळीमध्ये साजरा होणाऱ्या दीपोत्सवात आकर्षित, मनमोहक अशी शिवडीची श्री महालक्ष्मी मूर्ती, नेत्रदीपक सजावट व आयोजनासाठी सुप्रसिध्द असलेले शिवडीतील शिवडीची श्री महालक्ष्मी सार्वजनिक दीपोत्सव मंडळ यंदा हिरक महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. गतवर्षी साकारलेल्या तिरूपती बालाजीच्या देखाव्यास अनुसरून यंदा श्री महालक्ष्मी मंदिराची प्रतिकृती तसेच महालक्ष्मी मातेची आकर्षित, मनमोहक मूर्ती हे यंदाचे प्रमुख आकर्षण असणार आहे. यंदा ५१ फूट उंच असे महालक्ष्मी मंदिर हे मंडळ साकारत आहे. उत्सवाचा कालावधी १० ते १८ नोव्हेंबर २०२३ असा असून अभ्युदय बँक समोर,आशीर्वाद सोसायटी जवळ,शिवडी नाका (पश्चिम) येथे हे भव्यदिव्य आयोजन, सकारात्मक ऊर्जा व प्रसन्न चैतन्यमय वातावरण आपल्यास अनुभवायला मिळेल.

logo
marathi.freepressjournal.in