
मुंबई : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदारसंघांत जोरदार फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे. २६ ते २९ डिसेंबर या चार दिवसांत विभाग प्रमुख, शाखा प्रमुख आदी नेत्यांच्या बैठका आयोजित केल्या आहेत. मुंबईतील २२७ वॉर्डात मतदारांचे मत काय?, मतदारांच्या अपेक्षा काय? याची माहिती घेण्यात येणार आहे. विभाग प्रमुख व शाखा प्रमुख हे वॉर्ड पिंजून काढणार आहेत.
२६ ते २९ डिसेंबर दरम्यान पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत प्रत्येक पदाधिकाऱ्याला मते मांडण्याचा अधिकार देण्यात येणार आहे. यावेळी होणाऱ्या चर्चेनंतर पक्षाची पुढील रणनिती आखली जाईल. विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना या बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. पालिकेच्या तयारीचा आढावा घेऊन जानेवारी महिन्यात ठाकरे यांच्या शाखा भेटीचे आयोजन करण्यात येणार आहे.