भाऊचा धक्का येथील धक्कादायक घटना: विषारी वायूमुळे मासेमारी बोटीत दोघांचा मृत्यू

यलोगेट पोलिस ठाणे हद्दीत न्यू फिश जेटी येथे मच्छीमार नौका अंजनी पुत्र किरणभाई इश्वरभाई तांडेल यांनी मंगळवारी पहाटे दोन वाजता धक्क्यावर बोट आणली.
भाऊचा धक्का येथील धक्कादायक घटना: विषारी वायूमुळे मासेमारी बोटीत दोघांचा मृत्यू
PM
Published on

मुंबई : भाऊचा धक्का येथे मंगळवारी सकाळी मासेमारी बोटीच्या स्टोरेज चेंबरमध्ये साचलेला गॅस लिकेज झाला. यावेळी बोटीवर काम करणाऱ्या पाच जणांच्या नाकात विषारी वायू गेल्याने पाच जण गुदमरले. या सगळ्यांना तातडीने जे.जे. रुग्णालयात दाखल केले असता श्रीनिवास आनंद यादव (३५) आणि बोट मालक नागा डॉन संजय (२७) या दोघांचा मृत्यू झाल्याचे जे.जे. रुग्णालयाकडून  सांगण्यात आले. दरम्यान, सुरेश मेकला (२८) याची प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

यलोगेट पोलिस ठाणे हद्दीत न्यू फिश जेटी येथे मच्छीमार नौका अंजनी पुत्र  किरणभाई इश्वरभाई तांडेल यांनी मंगळवारी पहाटे दोन वाजता धक्क्यावर बोट आणली. त्यानंतर बोटीमधील खणात सकाळी ११ च्या  सुमारास कामगार मासे काढण्यासाठी उतरला असता गॅसमुळे एक जण बेशुद्ध पडला. त्याला बघण्यासाठी दुसरा गेला असता  तोही बेशुद्ध पडला, असे एकामागून एक सहा जण गुदमरुन बेशुद्ध पडल्याने त्यांना जे जे रुग्णालयात नेण्यात आले. यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. मासे सडल्यामुळे गॅस निर्माण झाल्याचा संशय आहे.

logo
marathi.freepressjournal.in