धक्कादायक! मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरुंवर जीवघेणा हल्ला; निलंबीत प्राध्यापकासह सहा जणांवर गुन्हा दाखल

या प्रकरणातील हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी माध्यामांना दिली आहे.
धक्कादायक! मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरुंवर जीवघेणा हल्ला; निलंबीत प्राध्यापकासह सहा जणांवर गुन्हा दाखल

मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरुना घरात घुसुन जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यापैकी एक जण निलंबीत प्राध्यपक असल्याचं सांगितलं जात आहे. या जीवघेण्या हल्ल्यात कुलगुरु गंभीर जखमी झाले आहेत. डॉ. अशोक प्रधान असं पीडित कुलगुरुचं नाव आहे. चार वर्षांपूर्वी शैक्षणिक संस्थेतील या हल्लेखोर प्राध्यापकांचं गैरवर्तन आणि कामबद्दल संस्थेच्या अनेक शाखांनी तक्रारी केल्यामुळे त्यांना कामावरुन निलंबीत केल होतं.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. अशोक प्रधान कल्याण पश्चिम भागातील कर्णिक रोडवरील प्रधान पंगल्यात राहत होते. चार वर्षांपूर्वी गैरवर्तन प्रकरणी संजय जाधव यांना प्राध्यापक पदावरुन निलंबित केलं होतं. या गोष्टीचा राग मनात धरुन त्यांनी कुलगुरुवर हल्ला केला. १९ नोव्हेंबरच्या सांयकाळी संजय जाधव हे चार मित्रांसह घरात घुसले आणि त्यांना बेदम मारहाण केली. या घटनेत डॉ. अशोक गंभीर जखमी झाले. घटनेनंतर सर्वजण फरार झाले. अशोक प्रधान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

या प्रकरणी कल्याण येथील महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी हल्लेखोरांविरोधात भारतीय दंड संहितानुसार गुन्हा दाखल करुन घेला आहे. निलंबित प्राध्यापक संजय जाधव त्याचा साथीदार संदेश जाधव, एक अल्पवयीन आणि एका महिलेसह दोन अनोखळी पुरुष अशी अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी माध्यामांना दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in