धक्कादायक! मुंबईमध्ये महिलांची सुरक्षा धोक्यात ; 15 वर्षाच्या मुलीला चाकूचा धाक दाखवून सामुहिक अत्याचार

या प्रकरणात आतापर्यंत एका आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
धक्कादायक! मुंबईमध्ये महिलांची सुरक्षा धोक्यात ; 15 वर्षाच्या मुलीला चाकूचा धाक दाखवून सामुहिक अत्याचार

महाराष्ट्र राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई ही देशातल्या सर्वात सुरक्षित शहरांपैकी एक म्हणून ओळखली जाते. मात्र, आता हिंच मुंबई महिला आणि मुलींसाठी असुरक्षित बनत चालली आहे. गेल्या काही महिन्यात मुंबईत महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. आता असाच एक प्रकार मुलुंडमध्ये समोर आला आहे. या ठिकाणी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका १५ वर्षीय मुलीवर सामुहित बलात्कार केल्याची घटना मुलुंडमध्ये घडली आहे. यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणात आतापर्यंत एका आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

मुलुंडमध्ये एका १५ वर्षाच्या मुलीवर ओळखीच्याच लोकांनी चाकूचा धाक दाखवून तसंच आईला जीवे मारण्याची धमकी देऊन सामुहिक बलात्कारची संतापजनक घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड विधान संहिता कलम आणि पोक्सो कायद्याअंदर्गत गुन्हा नोंद केला असून या प्रकरणी आतापर्यंत एका जणाला अटक करण्यात आली आहे.

मुलुंडमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. तसंच पालकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. आईला जीवे मारण्याची धमकी देऊन आणि चाकूचा धाक दाखवून नराधमांनी हे कृत्य केलं आहे. मुलुंड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन एका २१ वर्षीय आरोपीला अटक केली असून इतर आरोपींच्या शोधात पोलिसांचं पथक परराज्यात रवाना झालं आहे. पीडित मुलीला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचं एफआयआरमध्ये नमुद करण्यात आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी वेगवेगळ्या अँगलने तपास सुरु केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in