दादर रेल्वे स्थानकात माथेफिरूने कापले तरुणीचे केस

एका माथेफिरूने तरुणीचे केस कापण्याची घटना कापण्यासाठी दादर रेल्वे स्थानकात घडली. गर्दीचा फायदा घेत माथेफिरू यानंतर स्थानकातून फरार झाला.
दादर रेल्वे स्थानकात माथेफिरूने कापले तरुणीचे केस
Published on

मुंबई : एका माथेफिरूने तरुणीचे केस कापण्याची घटना कापण्यासाठी दादर रेल्वे स्थानकात घडली. गर्दीचा फायदा घेत माथेफिरू यानंतर स्थानकातून फरार झाला. याप्रकरणी सदर तरुणीने तक्रार केली असून मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलीस हे सीसीटीव्हीद्वारे या माथेफिरूचा शोध घेत आहेत.

तक्रारकर्ती तरुणी कल्याण येथील रहिवासी असून माटुंगा येथील महाविद्यालयात शिकत आहे. सोमवारी सकाळी ती दादर स्टेशनवर उतरली. पुलावर पोहोचल्यानंतर पाठीला टोचल्याचा तिला भास झाला. मागे वळून पाहिले असता एक जण वेगाने धावत होता. तिला खाली केस पडलेले दिसले. केसांवरून तिने हात फिरविल्यानंतर अर्धवट कापलेले केस तिच्या अंगावर पडले. माथेफिरूचा पिच्छा केला असता तो गर्दीतून पळून गेला.

logo
marathi.freepressjournal.in