अंधेरीतील स्वप्नाक्षय मंडळाचा प्रथम क्रमांक; BMC च्या ‘श्रीगणेश गौरव पुरस्कार स्पर्धा-२०२५’चा निकाल जाहीर

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘श्रीगणेश गौरव पुरस्कार स्पर्धा-२०२५’मध्ये सातबंगला, अंधेरी (पश्चिम) येथील स्वप्नाक्षय मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने प्रथम पुरस्कार (रुपये ७५,००० आणि सन्मानचिन्ह) पटकावला.
स्वप्नाक्षय मंडळ - प्रथम क्रमांक
स्वप्नाक्षय मंडळ - प्रथम क्रमांक
Published on

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘श्रीगणेश गौरव पुरस्कार स्पर्धा-२०२५’मध्ये सातबंगला, अंधेरी (पश्चिम) येथील स्वप्नाक्षय मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने प्रथम पुरस्कार (रुपये ७५,००० आणि सन्मानचिन्ह) पटकावला. तर, भायखळा (पूर्व) येथील पंगेरी चाळ सार्वजनिक उत्सव मंडळाने द्वितीय पुरस्कार (रुपये ५०,००० आणि सन्मानचिन्ह) आणि विक्रोळी (पश्चिम) येथील बालमित्र कला मंडळाने तृतीय पुरस्कारावर (रुपये ३५,००० आणि सन्मानचिन्ह) मोहोर उमटवली आहे.

पंगेरी चाळ सार्वजनिक उत्सव मंडळ - द्वितीय पुरस्कार
पंगेरी चाळ सार्वजनिक उत्सव मंडळ - द्वितीय पुरस्कार
बालमित्र कला मंडळ -  तृतीय पुरस्कार
बालमित्र कला मंडळ - तृतीय पुरस्कार

यंदा शाडू मातीच्या सर्वोत्कृष्ट श्रीगणेशमूर्तीचा पुरस्कार माहीम येथील शिवाजी पार्क (हाऊस) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास, तर सर्वोत्कृष्ट मूर्तिकाराचे पारितोषिक राजन झाड यांना मालवणी येथील युवक उत्कर्ष मंडळाच्या श्रीगणेश मूर्तीसाठी, तसेच सर्वोत्कृष्ट नेपथ्यकाराचे पारितोषिक घाटकोपर (पश्चिम) येथील बर्वेनगर व अखिल भटवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सजावटीसाठी श्रीकांत साळवी यांना जाहीर करण्यात आले आहे.

बर्वेनगर व अखिल भटवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ - सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार पारितोषिक
बर्वेनगर व अखिल भटवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ - सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार पारितोषिक
शिवाजी पार्क (हाऊस) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ - शाडू मातीच्या सर्वोत्कृष्ट श्रीगणेशमूर्तीचा पुरस्कार
शिवाजी पार्क (हाऊस) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ - शाडू मातीच्या सर्वोत्कृष्ट श्रीगणेशमूर्तीचा पुरस्कार

अवयवदान जागृतीसाठी दहीसर येथील श्रद्धा मित्र मंडळास, तर पर्यावरणविषयक जनजागृतीसाठी अंधेरी (पूर्व) येथील शिवगर्जना तरुण मित्र मंडळ आणि लोअर परळ येथील ओमसिद्धी विजय मित्र मंडळ यांना पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त १५ मंडळांना विशेष प्रशस्तिपत्रकेही जाहीर करण्यात आली आहेत. गुरुवार, ४ सप्टेंबर २०२५ रोजी महानगरपालिका मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये उपायुक्त (परिमंडळ-२) तथा गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी या स्पर्धेच्या निकालाची घोषणा केली.

logo
marathi.freepressjournal.in