श्रीकांत शिंदेनी शिवतीर्थवर येऊन राज ठाकरेंची घेतली भेट... नेमकं कारण काय ?

बैठक संपल्यानंतर राज ठाकरे पत्नी श्रीकांत शिंदे यांना सोडण्यासाठी 'शिवतीर्थ'बाहेर आले
श्रीकांत शिंदेनी शिवतीर्थवर येऊन राज ठाकरेंची घेतली भेट... नेमकं कारण काय ?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण मुंबईत एकाच व्यासपीठावर दिवाळीनिमित्त पाहिले. मनसेने डोंबिवलीत दीपोत्सव आणि  खासदार श्रीकांत शिंदे यांचाही कार्यक्रम एकाच ठिकाणी झाला. त्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी डोबिंवली येथील मनसे कार्यालयाला भेट दिली होती. मात्र आता श्रीकांत शिंदे राज ठाकरेंना भेटायला थेट शिवतीर्थवर गेल्याने वेगवेगळ्या चर्चा समोर येत आहेत. श्रीकांत शिंदे हे मनसेचे आमदार राजू पाटील यांचे विरोधक मानले जातात. मात्र, श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीतील कार्यालयाला भेट दिल्यामुळे युतीची चर्चा रंगली. आज श्रीकांत शिंदे यांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली आहे. दिवाळीनिमित्त ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जाते. बैठक संपल्यानंतर राज ठाकरे पत्नी श्रीकांत शिंदे यांना सोडण्यासाठी 'शिवतीर्थ'बाहेर आले.

गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढवल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात राज्यात नवी युती होण्याची चिन्हे आहेत. डोंबिवली येथील कार्यालयाला भेट दिल्यानंतर श्रीकांत शिंदे म्हणाले, "नवीन गृहीतकं बांधू नका. दरवर्षी मनसेच्या माध्यमातून फडके रोड येथे रोषणाई आणि विविध कार्यक्रम होतात. चांगले चित्र पाहायला मिळते, विरोधक आले की चांगल्या गोष्टी घडतात. दिवाळीच्या मुहूर्तावर सर्वजण एकत्र आहेत, विरोधक कितीही असले तरी एकमेकांच्या सूचना, आक्षेप घेऊन पुढे जायचे आहे, असे श्रीकांत शिंदे म्हणाले. मनसेचे आमदार राजू पाटील यांनीही श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन प्रतिक्रिया व्यक्त केली. “श्रीकांत शिंदे यांनी आमच्या नगराध्यक्षांच्या विनंतीला मान देऊन कार्यालयाला भेट दिली. राजकारणात आम्ही विरोधी असलो तरी शत्रू नाही. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपसोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आमची तयारी सुरू आहे. 

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in