शुक्ला, सरवदे, बिष्णोई, फळसणकर पोलीस महासंचालकपदासाठी चर्चेत

फोन टॅपिंग प्रकरणातील त्यांचे नाव चर्चेत आले होते. त्यामुळे त्यांना पोलीस महासंचालक केल्यास वादाला नवीन तोंड फुटू शकते.
शुक्ला, सरवदे, बिष्णोई, फळसणकर पोलीस महासंचालकपदासाठी चर्चेत

मुंबई : राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ हे डिसेंबरमध्ये निवृत्त होत आहेत. रश्मी शुक्ला, प्रज्ञा सरवदे, संदीप बिष्णोई व विवेक फणसळकर यांची नावे पोलीस महासंचालकपदासाठी चर्चेत आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने ३० वर्षे सेवा झालेल्या सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नावे मागवली आहेत. नियमानुसार, तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे लोकसेवा आयोगाला कळवली आहेत.

शुक्ला यांच्याबरोबरच संदीप बिष्णोई, विवेक फळसणकर, प्रज्ञा सरवदे १९८९ ची तुकडी आणि १९९० ची जयजीत सिंह, संजय वर्मा, अतुलचंद्र कुलकर्णी, बिपीनकुमार सिंग यांची नावे पाठवली आहेत.

सध्या रश्मी शुक्ला या शस्त्र सीमा बलात प्रतिनियुक्तीवर आहेत. या पदासाठी त्यांचे नाव चर्चेत आहेत. फोन टॅपिंग प्रकरणातील त्यांचे नाव चर्चेत आले होते. त्यामुळे त्यांना पोलीस महासंचालक केल्यास वादाला नवीन तोंड फुटू शकते.

मुंबई, ठाण्याला नवीन आयुक्त मिळणार?

मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फळसणकर यांचेही नाव पोलीस महासंचालकपदाच्या चर्चेत आहे. फळसणकर हे नवीन पोलीस महासंचालक बनल्यास मुंबईला नवीन पोलीस आयुक्त मिळू शकतो. तर ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांचा दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असून त्यांना बढती मिळाली. त्यामुळे ठाण्यालाही नवीन आयुक्त मिळण्याची शक्यता आहे. ठाण्याच्या नवीन आयुक्तपदासाठी अमिताभ गुप्ता, प्रशांत बुरडे, आशुतोष डुंबरे व निकेत कौशिक आदींची नावे चर्चेत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in