सिद्धार्थ रुग्णालयाचा पुनर्विकास लवकरच होणार

रुग्णालयाचा पुनर्विकास झाल्यानंतर पश्चिम उपनगरातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
सिद्धार्थ रुग्णालयाचा पुनर्विकास लवकरच होणार

सी वन म्हणजे अतिधोकादायक इमारत झाल्याने गोरेगाव येथील सिद्धार्थ रुग्णालय इमारत बंद आहे; मात्र आता रुग्णालयाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. तळ अधिक ११ मजली इमारत हे रुग्णालय असून, कर्मचारी व अधिकाऱ्यांचे निवासस्थानासाठी २० मजली दोन इमारती बांधण्यात येणार. रुग्णांसाठी सरकते जिने आणि अत्याधुनिक उपकरणासह ३०६ बेड्सचे अद्ययावत रुग्णालय बांधण्यात येणार आहे. यासाठी प्रशासकीय मंजुरी मिळाली असून निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या कामासाठी ४०५ कोटी ६२ लाख २२ हजार ८६८ रुपये खर्च अंदाजित आहे. दरम्यान, रुग्णालयाचा पुनर्विकास झाल्यानंतर पश्चिम उपनगरातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

केईएम, सायन, नायर, कूपर या प्रमुख रुग्णालयांसह १६ सर्वसाधारण रुग्णालये आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून पालिकेच्या प्रमुख रुग्णालयात मोठ्या विश्वासाने रुग्ण येत असतात. प्रमुख रुग्णालयांवर येणारा ताण कमी करण्यासाठी प्रशासनाने उपनगरातील रुग्णालयांचा पुनर्विकासासह अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थ रुग्णालयाचाही समावेश आहे. १९९८मध्ये गोरेगाव सिद्धार्थ नगर परिसरात सिद्धार्थ रुग्णालय बांधण्यात आले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in