Mumbai : सायन पुलासाठी मे २०२६ ची डेडलाइन; 'असा' आहे प्रकल्पाचा तपशील

शंभर वर्षांहून अधिक जुना असलेला पूर्व–पश्चिम रेल्वे उड्डाणपुलाला जोडणारा सायन पूल बंद झाल्यानंतर प्रवाशांचे हाल वाढले आहेत. त्या पार्श्वभूमीवर, हे काम गतीने सुरू ठेवण्यात आले असून आता हा पूल बांधून पूर्ण करण्यासाठी महापालिका आणि मध्य रेल्वेने ३१ मे २०२६ ची डेडलाइन जाहीर केली आहे.
सायन पुलासाठी मे २०२६ ची डेडलाइन
सायन पुलासाठी मे २०२६ ची डेडलाइनसंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : शंभर वर्षांहून अधिक जुना असलेला पूर्व–पश्चिम रेल्वे उड्डाणपुलाला जोडणारा सायन पूल बंद झाल्यानंतर प्रवाशांचे हाल वाढले आहेत. त्या पार्श्वभूमीवर, हे काम गतीने सुरू ठेवण्यात आले असून आता हा पूल बांधून पूर्ण करण्यासाठी महापालिका आणि मध्य रेल्वेने ३१ मे २०२६ ची डेडलाइन जाहीर केली आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये पूल वाहतुकीसाठी बंद झाल्यापासून शाळा, महाविद्यालये, रुग्णालये याठिकाणी ये-जा करणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे.

पूल बंद झाल्यावर पादचारी आणि वाहनचालकांना मोठ्या चकरा मारून इच्छित स्थळी जावे लागत आहे. नागरिकांनी सुरक्षित पर्याय उपलब्ध होईपर्यंत पाडकामाला विरोध केला होता. ऑक्टोबरमध्ये मध्य रेल्वेने तात्पुरता पादचारी पूल सुरू केला, ज्यामुळे उर्वरित पाडकाम सुरक्षितरीत्या करता आले. अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी पालिका मुख्यालयात घेतलेल्या बैठकीला संयुक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे तसेच महापालिका आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुलाच्या रेल्वे हद्दीतील भागाचे काम रेल्वेकडून तर अ‍ॅप्रोच रोड, दोन पादचारी अंडरपास आणि इतर कामे पालिकेकडून केली जात आहेत.

असा आहे प्रकल्पाचा तपशील

  • एलबीएस रोडवरील अंडरपास : डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण

  • धारावी बाजूचा अंडरपास : फेब्रुवारी २०२६ अखेरपर्यंत पूर्ण

  • रेल्वे पुलाच्या उत्तरेकडील गर्डर लाँचिंग : मार्च २०२६ चा पहिला आठवडा

  • दक्षिणेकडील गर्डर लाँचिंग : एप्रिल २०२६ चा पहिला आठवडा

logo
marathi.freepressjournal.in