सायन पूल आज पाडणार! एकूण २३ बस मार्गांत बदल; प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन

मध्य वाहतूक अंतर्गत माटुंगा व कुर्ला वाहतूक विभागातील पूर्व-पश्चिम जोडणारा सायन ओव्हर ब्रिज हा मध्य रेल्वे प्राधिकरणाकडून तोडून नवीन बांधण्यात येणार आहे.
सायन पूल आज पाडणार! एकूण २३ बस मार्गांत बदल; प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन

मुंबई : मध्य रेल्वेच्या सायन स्थानकातील ब्रिटिशकालीन ११० वर्षें जुना रोड ओव्हर पूल शनिवारी पाडण्यात येणार आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. सायन रोड ओव्हर पूल वाहतुकीसाठी बंद केल्यानंतर बेस्टच्या बस मार्गांत बदल करण्यात आले आहे.

मध्य वाहतूक अंतर्गत माटुंगा व कुर्ला वाहतूक विभागातील पूर्व-पश्चिम जोडणारा सायन ओव्हर ब्रिज हा मध्य रेल्वे प्राधिकरणाकडून तोडून नवीन बांधण्यात येणार आहे. माटुंगा वाहतूक विभागातून बाबासाहेब आंबेडकर मार्गावरून सायन ओव्हर ब्रिज पश्चिम वाहिनी मार्गे एल.बी.एस. रोड तसेच संत रोहिदास रोडकडे जाणारी वाहतूक त्याचप्रमाणे कुर्ला वाहतूक विभागातून एल.बी.एस. रोड तसेच संत रोहिदास रोडवरून सायन ओव्हर ब्रिज पूर्व वाहिनीवरून आंबेडकर मार्गे जाणारी वाहतूक ही शनिवारपासून पुढील १८ महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद करून सदर मार्गावरील वाहतूक इतर मार्गाने वळवून खालीलप्रमाणे वाहतूक व्यवस्थापन करण्यात आलेले आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने देखील आपल्या बस मार्गात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

असा आहे बस मार्गांत बदल

११ मर्यादित ही बस कला नगर मार्गे टी जंक्शन व सुलोचना शेट्टी मार्गाने सायन हॉस्पिटल मार्गे नेव्ही नगर येथे जाईल.

१८१, २५५ म. ३४८ म. ३५५ मर्यादित या बस कला नगर मार्गे टी जंक्शन व सुलोचना शेट्टी मार्गाने सायन हॉस्पिटल सायन सर्कल मार्गे जातील.

बस क्र. ए ३७६ ही सायन सर्कलहून सायन हॉस्पिटल सुलोचना शेट्टी मार्गाने बावरी कॅम्प मार्गे माहीम येथे जाईल.

सी ३०५ ही बस धारावी आगारहून पिवळा बांगला टी जंक्शन व सुलोचना शेट्टी मार्गाने सायन हॉस्पिटलहून बॅकबे आगार येथे जाईल.

बस क्र. ३५६ म, ए ३७५, सी ५०५ या बस कला नगर बी के सीहून प्रियदर्शनी येथे जातील.

बस क्र. ७ म, २२ म, २५ म व ४११ या बस महाराष्ट्र काटा, धारावी आगारहून पिवळा बांगला टी जंक्शन व सुलोचना शेट्टी मार्गाने सायन हॉस्पिटलमार्गे जातील.

बस क्र. ३१२ व ए ३४१ या बस महाराष्ट्र काटा, धारावी आगारहून पिवळा बांगला टी जंक्शन व सुलोचना शेट्टी मार्गाने सायन हॉस्पिटल, सायन सर्कल मार्गे जातील.

बस क्र. ए सी ७२ भायंदर स्थानक ते काळाकिल्ला आगार व सी ३०२ ही बस मुलुंड बस स्थानक ते काळाकिल्ला आगार येथे खंडित करण्यात येईल.

बस क्र. १७६ व ४६३ या बस काळाकिल्ला आगार येथून सुटतील व सायन स्थानक ९० फूट मार्गाने लेबर कॅम्प मार्गाने दादर- माटुंगा स्थानकाकडे जातील.

बस क्र. ए सी १० जलद, ए २५ व ३५२ या बसगाड्या राणी लक्ष्मीबाई चौक येथे खंडित करण्यात येथील व तेथूनच सुटतील.

logo
marathi.freepressjournal.in