Mumbai : शीव उड्डाणपुलाची एक मार्गिका ३१ ऑगस्टपर्यंत सुरू होणार? धारावी बचाव आंदोलनाच्या शिष्टमंडळाला रेल्वे अधिकाऱ्यांचे आश्वासन

बांधकाम रखडल्याने धारावीसह मुंबईतील वाहतूक सेवा विस्कळीत झाल्याने मुंबईकरांचे हाल होत आहेत.
Mumbai : शीव उड्डाणपुलाची एक मार्गिका ३१ ऑगस्टपर्यंत सुरू होणार? धारावी बचाव आंदोलनाच्या शिष्टमंडळाला रेल्वे अधिकाऱ्यांचे आश्वासन
Mumbai : शीव उड्डाणपुलाची एक मार्गिका ३१ ऑगस्टपर्यंत सुरू होणार? धारावी बचाव आंदोलनाच्या शिष्टमंडळाला रेल्वे अधिकाऱ्यांचे आश्वासनसंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : बांधकाम रखडल्याने धारावीसह मुंबईतील वाहतूक सेवा विस्कळीत झाल्याने मुंबईकरांचे हाल होत आहेत. त्यामुळे पुलाचे काम १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याच्या मागणीसाठी धारावी शीव उड्डाणपुलाचे शिष्टमंडळाने मध्य रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी ३१ बचाव आंदोलनाच्या ऑगस्टपर्यंत उड्डाणपुलाची एक मार्गिका सुरू करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

शीव रेल्वे उड्डाणपूल गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून बंद आहे. त्यामुळे धारावीतील नागरिकांना शीव पूर्व भागात जाण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांचे हाल होत असून, ९० फूट रस्त्यावर कायम वाहतूककोंडी निर्माण होत आहे. यामुळे स्थानिकांच्या दैनंदिन व्यवसायावर आणि रोजगारावरही परिणाम होत असल्याचा दावा धारावी बचाव आंदोलनाच्या नेत्यांनी केला आहे.

पूलाच्या बांधकामास सुरुवात झाल्यानंतर दोन वर्षांत काम पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्याप काम पूर्ण झालेले नाही.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in