सायन उड्डाणपुलावरून ३० महिन्यांनंतर BEST धावणार; मुंबईकरांसह वाहनचालकांना दिलासा

३० महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सायन रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी आज गुरुवारपासून खुला होणार आहे. त्यामुळे मुंबईतील बेस्ट बस सेवेच्या मार्गांत मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
सायन उड्डाणपुलावरून ३० महिन्यांनंतर BEST धावणार; मुंबईकरांसह वाहनचालकांना दिलासा
सायन उड्डाणपुलावरून ३० महिन्यांनंतर BEST धावणार; मुंबईकरांसह वाहनचालकांना दिलासाप्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

मुंबई : ३० महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सायन रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी आज गुरुवारपासून खुला होणार आहे. त्यामुळे मुंबईतील बेस्ट बस सेवेच्या मार्गांत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. पुलाच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीच्या कामामुळे वळविण्यात आलेले अनेक बसमार्ग पुन्हा पूर्ववत करण्यात येणार आहे. त्यामुळे चेंबूर, धारावी, सायन आणि पूर्व-पश्चिम मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, चेंबूरहून वांद्रे-कुर्ला संकुलाकडे (बीकेसी) जाणाऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या बसमार्गांची संख्या कमी होण्याची शक्यता असल्याने या प्रवाशांची चिंता वाढली आहे.

सायन रेल्वे उड्डाणपूल बंद असल्यामुळे बेस्टला अनेक बसमार्गांमध्ये बदल करावे लागले होते. काही बसगाड्या बीकेसी कनेक्टरमार्गे वळविण्यात आल्या, तर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी काही अतिरिक्त आणि मर्यादित बससेवा सुरू करण्यात आल्या. आता उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर या पर्यायी व्यवस्थेचा आढावा घेऊन बसमार्ग पूर्ववत करण्याची प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता आहे.

सायन उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर चेंबूरहून धारावीकडे जाणारे ए-३५६, ए-३७५, ए-३७६ आणि एसी-५०५ हे बसमार्ग पूर्ववत होण्याची शक्यता आहे.

या बस पुन्हा सुरू होतील का?

बंद करण्यात आलेले सी-३०२ आणि ३५५ मर्यादित हे बसमार्ग पुन्हा सुरू होणार का, तसेच एसी-१० हा मार्ग धारावी आगारापर्यंत आणि ए-२५ हा मार्ग कुर्ला आगारापर्यंत पुन्हा विस्तारित होणार का, याबाबतही प्रवाशांमध्ये उत्सुकता आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in