सायन उड्डाणपूल लवकरच बंद: पर्यायी मार्गाची वाट बिकट बेस्ट बसेससह वाहनचालकांना वळसा घालावा लागणार; इंधनाच्या खर्चातही वाढ

सायन उड्डाणपूल पुनर्बांधणीसाठी बंद केल्यावर पुलावरील वाहतूक पर्यायी मार्गांवर वळवण्यात येणार आहे
सायन उड्डाणपूल लवकरच बंद: पर्यायी मार्गाची वाट बिकट बेस्ट बसेससह वाहनचालकांना वळसा घालावा लागणार; इंधनाच्या खर्चातही वाढ

मुंबई : मध्य रेल्वेच्या अखत्यारित असलेल्या सायन उड्डाणपुलाची पुनर्बांधणी, पाचव्या व सहाव्या लेनचे काम यासाठी पूल लवकरच बंद करण्यात येणार आहे. वाहतुकीसाठी पूल बंद केल्यानंतर सायन रुग्णालय व बीकेसीला जोडणाऱ्या पुलावरून वाहनचालकांना गाड्या घेऊन जाणे भाग पडणार आहे. त्यामुळे वाहनचालकांसाठी पर्यायी मार्गांची वाट बिकट ठरणार आहे. दरम्यान, वाहनधारकांना वळसा घालावा लागणार असल्याने इंधनाच्या खर्चातही वाढ होणार आहे.

सायन उड्डाणपूल पुनर्बांधणीसाठी बंद केल्यावर पुलावरील वाहतूक पर्यायी मार्गांवर वळवण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग हा खूप अडचणींचा असून, काही ठिकाणी मोठे वळसे घालावे लागणार आहे. त्यामुळे वाहनचालकांचे खूप हाल होणार असून, खूप मोठ्या प्रमाणात बस पर्यायी मार्गावर वाळवाव्या लागणार आहेत.

शीव उड्डाणपूल हा मुंबई शहर व दोन्ही उपनगरांना जोडणारा महत्वाचा पूल आहे. लालबहादूर शास्त्री मार्गावरील हा पूल बंद झाल्यास पर्यायी मार्ग असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड ते धारावी कुंभारवाडा जंक्शनला जोडणारा सुलोचना शेट्टी उड्डाणपूल असल्याने त्या पुलावर वाहतूककोंडीची मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in