रक्त संकलनात सायन रुग्णालय आग्रसर

२०२१ मध्ये १५४ रक्तदान शिबिरे आयोजित करण्यासह १४ हजार ३४८ पिशव्यांचे रक्तसंकलन केल्याची दखल घेण्यात आली
रक्त संकलनात सायन रुग्णालय आग्रसर

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून रक्त संकलन करणे हीदेखील मोठी जबाबदारी असते. सायन रुग्णालयात २०२० मध्ये १६९ रक्तदान शिबिरे आयोजित करणे आणि १५ हजार ५८९ रक्त पिशव्यांचे संकलन; तर २०२१ मध्ये १५४ रक्तदान शिबिरे आयोजित करण्यासह १४ हजार ३४८ पिशव्यांचे रक्तसंकलन केल्याची दखल घेण्यात आली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे व औषध व प्रशासन विभागाचे मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते राज्यस्तरीय रक्तदाता म्हणून गौरव करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मोहन जोशी यांनी दिली आहे.

१४ जून रोजी 'जागतिक रक्तदाता दिन' असतो. यानिमित्ताने मुंबईतील नरिमन पॉईंट परिसरात असणाऱ्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमादरम्यान शिव रुग्णालयाच्या रक्तकेंद्राचा सन्मान करण्यात आला आहे. लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयातील रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर आशिष मिश्रा आणि संबंधित समुपदेशक सुनिता घमंडी यांनी हा सन्मान स्वीकारला. या कार्यक्रमाला राज्याच्या रक्तसंक्रमण परिषदेच्या संचालक डाॅ. साधना तायडे आणि सहाय्यक संचालक डॉ. अरुण थोरात हे मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in