Mumbai : सायन रुग्णालयातील कंत्राटी कामगारांना दिलासा; ३५२ कर्मचाऱ्यांच्या कंत्राटासाठी १२ कोटींचा खर्च

शीव येथील लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालयातील बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांच्या कंत्राटी सेवेसाठी महापालिका १२ कोटी २० लाख रुपये खर्च करणार आहे.
Mumbai : सायन रुग्णालयातील कंत्राटी कामगारांना दिलासा; ३५२ कर्मचाऱ्यांच्या कंत्राटासाठी १२ कोटींचा खर्च
Mumbai : सायन रुग्णालयातील कंत्राटी कामगारांना दिलासा; ३५२ कर्मचाऱ्यांच्या कंत्राटासाठी १२ कोटींचा खर्चसंग्रहित छायाचित्र
Published on: 

मुंबई : शीव येथील लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालयातील बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांच्या कंत्राटी सेवेसाठी महापालिका १२ कोटी २० लाख रुपये खर्च करणार आहे.

रुग्णालयातील कामकाजासाठी २४६ पुरुष आणि १०६ महिला अशा एकूण ३५२ बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. या कर्मचाऱ्यांचा पुरवठा करण्यासाठी महापालिकेने ई-निविदा मागविल्या होत्या. निविदा प्रक्रियेत तीन कंत्राटदारांनी सहभाग घेतला. यात मे. एन. के. कॉर्पोरेशन, मे. ओरां एफ.एम.एस. प्रा. लि. आणि मे. सिक्युअर सेंस कमर्शियल प्रा. लि. या कंपन्यांचा समावेश होता.

...तर कारवाईचा बडगा

कंत्राटदाराने कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर देणे, पीपीएफ आणि विम्याचे हप्ते भरणे, आवश्यक गणवेश व ओळखपत्र उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील. कर्मचाऱ्यांच्या सेवेत त्रुटी आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्याची तरतूदही आहे. याबाबतचा प्रस्ताव गुरुवारी स्थायीच्या समितीत येईल.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)