शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओप्रकरणाची एसआयटी चौकशी होणार; मंत्री शंभुराज देसाईंची माहिती

शीतल म्हात्रे यांच्या आक्षेपार्ह व्हायरल व्हिडीओ प्रकरणी आता एसआयटी चौकशी होणार असल्याची घोषणा मंत्री शंभूराज शंभुराज देसाईंनी केली
शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओप्रकरणाची एसआयटी चौकशी होणार; मंत्री शंभुराज देसाईंची माहिती
Published on

शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. यानंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापले असून हा व्हिडीओ मॉर्फ करून बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याची टीका शीतल म्हात्रे यांनी केली आणि हा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली. आता या प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार असल्याची माहिती मंत्री शंभुराज देसाई यांनी दिली आहे.

विधानसभेत माहिती देताना ते म्हणाले की, "शीतल म्हात्रे मॉर्फिंग व्हिडीओ प्रकरणात एसआयटीची स्थापना करण्यात येणार आहे. विनायक डावरे या ठाकरे गटाच्या सोशल मीडिया स्टेट कॉर्डिनेटरला अटक केली आहे. तर इतर आरोपींसह त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात अली आहे. आत्तापर्यंत मुंबई पोलिसांनी ४ मोबाइल आणि ६ सिमकार्ड जप्त केले आहेत. तसेच, या प्रकरणाचा ६ सायबर टीम अधिक तपास करत आहेत."

दरम्यान, शीतल म्हात्रे यांनी हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांवर टीका केली. हा व्हिडीओ पसरवण्यामध्ये मातोश्रीचा हात असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकारामध्ये आत्तापर्यंत ५ जणांना अटक करण्यात आले असून यातील काही जण हे ठाकरे गटातील पदाधिकारी असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे आजच ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे साईनाथ दुर्गे यांनादेखील अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता यामागे मास्टरमाईंड कोण आहे? याचा तपास सुरु आहे.

logo
marathi.freepressjournal.in