दिशाच्या घरी एसआयटी पथक

आतापर्यंत दिशाने आत्महत्याच केली असल्याचे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे होते.
दिशाच्या घरी एसआयटी पथक
PM
Published on

मुंबई : दिशा सालियनच्या घरी मुंबई पोलिसांच्या एसआयटीची टीम शुक्रवारी दाखल झाली. दिशाच्या कुटुंबीयांनी योग्य चौकशी करून सत्य समोर आणण्याची विनंती पोलिसांना केली. एसआयटी दिशा सालियनच्या घरी पोहोचली, त्यावेळी त्यांनी मोठा आरोप केल्याचे समोर आले. तिच्या कुटुंबीयांनी तिच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे. आतापर्यंत दिशाने आत्महत्याच केली असल्याचे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे होते. पण, आता सातत्याने जे पुरावे किंवा आरोप करण्यात येत आहेत, त्यामुळे तिच्या कुटुंबीयांना देखील संशय निर्माण झाला आहे.

logo
marathi.freepressjournal.in