कृत्रिम पावसासाठी सहा कंपन्यांचा पुढाकार

प्रदूषणमुक्त मुंबईसाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
कृत्रिम पावसासाठी सहा कंपन्यांचा पुढाकार
PM

मुंबई : प्रदूषणास कारणीभूत धुळीचे कण हवेत पसरु नये यासाठी मुंबईत कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार आहे. यासाठी अनुभवी कंपन्यांना साद घातली असून,सहा भारतीय कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. याबाबत लवकरच निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

प्रदूषणमुक्त मुंबईसाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येणार आहे. यासाठी जागतिक स्तरावर ४ डिसेंबर रोजी स्वारस्य अभिरुची मागवण्यात आली होती. आतापर्यंत स्वारस्य अभिरुचीस सहा भारतीय कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. आता पुढील प्रक्रिया राबवण्यासाठी निविदा मागवण्यात येणार आहे. दरम्यान, कृत्रिम पावसासाठी मागवण्यात आलेल्या स्वारस्य अभिरुचीस मुदतवाढ न देता पुढील निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

तंत्रज्ञान समजून घेणार!

-वेत धुळीचे कण, प्रदूषण थांबून राहत असल्यामुळे कृत्रीम पावसाचा प्रयोगही केला जाणार आहे. यासाठी कंपन्यांकडून त्यांचे तंत्रज्ञान समजावून घेतले जाणार आहे.

- पात्र ठरणारे तंत्रज्ञान निश्चित झाल्यानंतर मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली जाणार आहेत. यानंतर या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहेत.

-‘एअर क्वालिटी इंडेक्स’ १०० पर्यंत असल्यास कृत्रिम पाऊस पाडण्याची गजर पडणार नाही. ‘एक्यूआय’ वाढल्यास कृत्रीम पाऊस पाडला जाईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in