कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्ये प्रकरणी 'एटीएस’ला सहा आठवड्यांची मुदत

या प्रकरणाच्या तपासासाठी सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले होते
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्ये प्रकरणी 'एटीएस’ला सहा आठवड्यांची मुदत

कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासाची सूत्रे नुकतीच हाती घेतलेल्या राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) या प्रकरणाच्या तपासाचा प्रगती अहवाल सहा आठवड्यांत सादर करा, असे आदेश न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने शनिवारी दिले.

१५ फेब्रुवारी २०१५ मध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे यांची कोल्हापुरात हत्या करण्यात आली. या प्रकरणाच्या तपासासाठी सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले होते; मात्र गेल्या सात वर्षांत तपासात म्हणावी तशी प्रगती झाली नाही. त्यामुळे एसआयटीच्या तपासाबाबत नाराजी व्यक्त करत पानसरे कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत हत्येचा तपास एटीएसकडे वर्ग करण्याची विनंती केली होती.

याची गंभीर दखल घेत न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने गेल्याच आठवड्यात या प्रकरणाचा तपास एटीएसकडे वर्ग केला. एटीएसच्या अधिकाऱ्यांचा समावेश, तसेच अतिरिक्त पोलीस महासंचालकांपैकी एका अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विशेष पथक स्थापन करा. ती व्यक्ती या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पथकातील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत निर्णय घेईल, असे स्पष्ट करत एका आठवड्यात विशेष पथक स्थापन करून अहवाल सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in