चोरीच्या चार गुन्ह्यांत साडेसोळा लाखांचा मुद्देमाल पळविला

याप्रकरणी एल. टी मार्ग, खार आणि मालाड चार स्वतंत्र चोरीच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे.
चोरीच्या चार गुन्ह्यांत साडेसोळा लाखांचा मुद्देमाल पळविला

मुंबई: काळबादेवी, खार आणि मालाड येथील चोरीच्या चार घटना उघडकीस आल्या असून, या चारही गुन्ह्यांत नोकरांनी सुमारे साडेसोळा लाखांचा मुद्देमाल पळवून नेला आहे. याप्रकरणी एल. टी मार्ग, खार आणि मालाड चार स्वतंत्र चोरीच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. संगलप अरुण प्रमाणिक हे सोने कारागिर असून, त्यांचा सोन्याचे दागिने बनविण्याचा कारखाना आहे. ते विविध व्यापार्‍याकडून ऑर्डर घेऊन त्यांना सोन्याचे दागिने बनवून देण्याचे काम करतात. याच कारखान्यात शेख सलीम ऊर्फ एस. के. सेलीम जमशेद हा कामाला होता. गेल्या आठवड्यात त्याने सुमीत मन्ना यांच्या बॅगेतील सुमारे पाच लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पलायन केले होते. हा प्रकार नंतर संगलप प्रमाणिक यांना समजताच त्यांनी शेख सलीमविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in