सोळा लाखांच्या सोन्याची फसवणूक

१६ लाखांचे २८२ ग्रॅम शुद्ध सोने नेकलेस बनविण्यासाठी दिले
सोळा लाखांच्या सोन्याची फसवणूक

मुंबई : सोळा लाखांच्या सोन्याच्या फसवणुकीप्रकरणी अब्दुल हलीम खान या व्यापाऱ्याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. नेकलेस बनविण्यासाठी घेतलेल्या सोन्याचा अपहार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. धीरज छबीनाथ सोनी यांचे भुलेश्‍वर येथे जय वैष्णव नावाचे सोन्याचे दुकान असून ते व्यापाऱ्यांना होलसेलमध्ये दागिन्यांची विक्री करतात. त्यांच्यासाठी अब्दुल खान हा सोन्याचे दागिने बनविण्याचे काम करतो. नोव्हेंबर २०२२ मध्ये धीरज यांनी अब्दुलला सुमारे १६ लाखांचे २८२ ग्रॅम शुद्ध सोने नेकलेस बनविण्यासाठी दिले होते. त्याने त्यांना दहा दिवसांत नेकलेस बनवून देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने नेकलेस बनवून दिले नाही. तो विविध कारण सांगून त्यांना टाळत होता. त्याने सोने किंवा नेकलेस परत न करता त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी अब्दुल खानविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती.

logo
marathi.freepressjournal.in