मुंबई : अंधेरीतील एका व्यापाऱ्याच्या अपहरणासह ५० लाखांच्या खंडणीप्रकरणी सहाव्या आरोपीस गोरेगाव येथून गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. सचिन संतोष सिंग असे या आरोपीचे नाव असून, अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सचिन हा या गुन्ह्यांतील सहावा असून, त्याच्या अटकेने या गुन्ह्यांतील सर्व आरोपींना अटक करण्यात यश आल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांनी सांगितले. ३० जूनला अंधेरीतील एका व्यापाऱ्यांचे खंडणीसाठी अपहरण करण्यात आले. ड्रग्जच्या गुन्ह्यांत अटकेची धमकी देऊन त्यांच्याकडे ५० लाखांची खंडणीची मागणी करण्यात आली होती. या टोळीने त्यांच्याकडून त्यांचा मोबाईलसह सव्वापाच लाखांची खंडणी वसुली केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच एसीपी महेश देसाई, प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक व त्यांच्या पथकाने कटातील मुख्य आरोपी दिपक विलास जाधव याच्यासह त्याचे चार सहकारी पंकजकुमार कैलासचंद्र पाल, सचिन विजय मल्होत्रा, दिलीप दगडू मंजुळकर आणि रुस्तम मुस्तफा शाह यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत संतोष सिंग याचे नाव समोर आले होते. त्याचा शोध सुरू असताना त्याला दया नायक व त्यांच्या पथकाने गोरेगाव येथून अटक केली. या आरोपींकडून पोलिसांनी cआहेत.