मुंबई : एसजे लॉजिस्टिक्सचा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी १२ ते १४ डिसेंबर दरम्यान सुरू राहील. माशितला सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड हे एसजे लॉजिस्टिक्स आयपीओचे रजिस्ट्रार आहेत, हेम सिक्युरिटीज लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत. डीआरएचपीनुसार हेम फिनलीज एसजे लॉजिस्टिक्सचा आयपीओकरिता मार्केट मेकर आहेत. एसजे लॉजिस्टिक्स आयपीओसाठी प्रस्तावित लिस्टिंग तारीख मंगळवार, १९ डिसेंबर २०२३ आहे आणि हे लिस्टिंग एनएसई इमर्जवर होईल. एसजे लॉजिस्टिक्सने आपली आयपीओ प्राईस बँड प्रत्येक शेयरसाठी १२१ ते १२५ रुपये निश्चित केली आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १.२५ लाख रुपये जमा करावे लागतील कारण अर्जासाठी किमान लॉट आकार १००० शेअर्स आहे. एचएनआयना किमान दोन लॉट किंवा २००० शेअर्स, एकूण २.५ लाख रुपये गुंतवणे आवश्यक आहे. ४८ कोटी रुपयांचे भांडवल उभारण्यासाठी कंपनीने आयपीओ जाहीर केला आहे ज्यामध्ये ती १००% बुक-बिल्डिंग इश्यूद्वारे ३८.४ लाख नवीन शेअर्स ऑफर करेल.