
मुंबई : देशातील बीपीओ आणि बीएफएसआय या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने एनआयआयटी फाउंडेशन आणि एंजल वन या संस्थांनी उद्योगांच्या अपेक्षेनुसार कौशल्ये वाढवण्याच्या उद्देशाने एक संयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. वंचित समुदायातील मुलांना प्रशिक्षणामुळे या क्षेत्रात नोकरीची संधी मिळावी, यावर भर देण्यात आला आहे. मे २०२२ मध्ये सुरू करण्यात आलेल्या, या उपक्रमाचा प्राथमिक उद्देश वंचित समुदायातील तरुणांना आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन रोजगारसक्षम करणे हा आहे. कोविड-१९ साथीमुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी वंचित समुदायाच्या गरजा पूर्ण करणे हे अनिवार्य बनले आहे.