मुंबईत संथ मतदान का? मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल, दिले चौकशीचे आदेश

सर्व तक्रारींची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून....
File
File(संग्रहित छायाचित्र)

मुंबई: काल देशभरात लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडलं. राज्यातील १३ मतदारसंघांचा यामध्ये समावेश होता. दरम्यान काल राज्यातील विविध मतदानकेंद्रांवर मतदान प्रक्रियेदरम्यान गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. खासकरून मुंबईमध्ये अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मतदान संथ पद्धतीनं होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. याबाबतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले जात होते. उद्धव ठाकरे यांनीही काल सायंकाळी तातडीनं पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाच्या नियोजनशून्य कारभारावर टीका केली होती. दरम्यान मतदानादरम्यान घडलेल्या या सर्व तक्रारींची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून मुख्य सचिवांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

राज्यात मुंबईसह १३ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडलं. यापूर्वी झालेल्या चार टप्प्यांच्या तुलनेत पाचव्या टप्यातील मतदानाची टक्केवारी घटली आहे. नागरिक उत्स्फुर्तपणे मतदानाला आले असताना, मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा असतानाही मतदानाची टक्केवारी घटण्यामागे मतदान प्रक्रियेतील संथपणा कारणीभूत होता का? याची चौकशी करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आदेश.

मतदानावेळी वृद्ध मतदारांना रांगेचा आणि कडक उन्हाचा मतदारांना झालेला त्रास त्यामुळे मतदानावर झालेला परिणाम यांची सविस्तर चौकशीचे करण्याचे एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिव करीर यांना आदेश दिलेत. पाचव्या टप्यातील मतदान प्रक्रियेची प्रशासनाने पुरेसी काळजी घेतली नव्हती का? मतदान टक्केवारी कमी का झाली? प्रशासन कुठे कमी पडले याची तात्काळ चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश दिलेत.

logo
marathi.freepressjournal.in