झोपडपट्टी वासीयांना मिळणार स्व:ताचे घर; महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय

राज्य सरकारने झोपडीच्या बदल्यात अडीच लाखात पक्के घर देण्याची योजना आणली आहे
झोपडपट्टी वासीयांना मिळणार स्व:ताचे घर; महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय

राज्य सरकारेने झोपडपट्टी धारकांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारी 2000 ते 1 जानेवारी 2011 या काळातील झोपडीधारकांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. या झोपडी धारकांना झोपडीच्या बदल्यात घर मिळणार आहे. या निर्णयामुळे मुंबईत स्व:ताच पक्क घर असण्याचे स्वप्न पुर्ण होणार आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गृहनिर्माण खात्याची जबाबदारी आहे. त्यांच्या अखत्यारीतील विभागाने हा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या परीपत्रकानुसार, 1 जानेवारी 2000 ते 1 जानेवारी 2011 या काळातील मुंबईतील झोपडी धारकांना सशुल्क घर मिळणार आहे. यामुळे लाखो लोकांना स्व:ताचे घर मिळणार आहे. झोपडीच्या बदल्यात 2 लाख 50 हजार रुपयांत हे घर दिले जाणार आहे. सरकारकडून पुनर्वसन सदनिकेची रक्कम अडीच लाख रुपये येवढी निश्चित करण्यात आली आहे. मात्र यासाठी काही अटी असणार आहेत.

राज्य सरकारने झोपडीच्या बदल्यात अडीच लाखात पक्के घर देण्याची योजना आणली आहे. या योजनेत काही अटी आणि शर्थी लागू असतील. या अटी शर्थी निश्चित करण्याची जबाबदारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in