स्मार्ट मीटारचे कंत्राट अदाणीला; बेस्टच्या १० लाख ग्राहकांचे मीटर होणार स्मार्ट

बेस्ट उपक्रमाच्या माध्यमातून १० लाख ५० लाख वीज ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्यात येतो
स्मार्ट मीटारचे कंत्राट अदाणीला; बेस्टच्या १० लाख ग्राहकांचे मीटर होणार स्मार्ट

चुकीचे रिडिंग, जादा बिल या अशायाच्या तक्रारी आता दूर होणार आहेत. १० लाख ५० हजार वीज ग्राहकांचे वीज मीटर स्मार्ट मीटर बसवण्यात येणार असून यासाठी अदाणीला कंपनीला १,३०० कोटींचे कंत्राट देण्यात आले आहेत. अदाणी कंपनीलाच मीटर परचेस करत बसवण्याची जबाबदारी अदाणी कंपनीची असणार आहे.

बेस्ट उपक्रमाच्या माध्यमातून १० लाख ५० लाख वीज ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्यात येतो. मीटर रिडिंग चुकीचे होत असल्याने जादा बिल येते, असा आरोप ग्राहकांकडून होतो. ग्राहकांची तक्रार दूर करण्यासाठी आता स्मार्ट ईलेक्ट्रीक मीटर बसवण्यात येणार आहेत. यामुळे मीटर रिडिंग करण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष ठिकाणी जाण्याची गरज पडणार नाही. स्मार्ट मीटरमुळे ग्राहक व बेस्ट उपक्रमाला मीटर रिडिंगची माहिती मोबाईल उपलब्ध होईल. तसेच वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती मेसेज द्वारे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जुने मीटर बदलून पुढील दोन वर्षांत स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत. या स्मार्ट मीटरमुळे ग्राहक २४ तास आपल्या मीटरची रिडिंगची माहिती मोबाईलवर उपलब्ध होईल.

दरम्यान, अदाणी इलेक्ट्रिक सिटी देशभरात वीज पुरवठा करत असून या कंपनीला स्मार्ट मीटर परचेस करत वीज ग्राहकांना बसवून देणे ही जबाबदारी अदाणी कंपनीची असणार आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in