गोरखपूर एक्स्प्रेसमधून धूर, प्रवासी भयभीत: मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

डोंबिवली ते ठाकुर्लीदरम्यान डाऊन जलद मार्गावर सोमवारी सकाळी गोरखपूर एक्स्प्रेसच्या एस-८ डब्यांमधून धूर आल्याने प्रवासी भयभीत झाले.
गोरखपूर एक्स्प्रेसमधून धूर, प्रवासी भयभीत: मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले
Published on

मुंबई : डोंबिवली ते ठाकुर्लीदरम्यान डाऊन जलद मार्गावर सोमवारी सकाळी गोरखपूर एक्स्प्रेसच्या एस-८ डब्यांमधून धूर आल्याने प्रवासी भयभीत झाले. घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने सकाळी ६.५१ वाजता धुराचे लोट आटोक्यात आल्यानंतर एक्स्प्रेस मार्गस्थ झाली. या घटनेमुळे तपोवन, इंद्रायणी एक्स्प्रेससह अन्य रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले.

मध्य रेल्वे मार्गावर डोंबिवली ते ठाकुर्लीदरम्यान गोरखपूर एक्स्प्रेसमधून धूर निघू लागल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. एक्स्प्रेसमध्ये ‘ब्रेक बाइंडिंग’ची समस्या झाल्याने एक्स्प्रेसची चाके रेल्वे रुळांवरून धावू शकत नव्हती. या घटनेची माहिती रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. डब्याला आग लागण्याची भीती प्रवाशांना होती. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली होती. रेल्वे अधिकारी कर्मचाऱ्यांनी तत्काळ दुरुस्तीची कामे करून धुराचे लोट आटोक्यात आणले.

यानंतर घटनास्थळावरून एक्स्प्रेस मार्गस्थ झाली. गोरखपूर एक्स्प्रेसच्या बिघाडामुळे तपोवन, इंद्रायणी एक्स्प्रेससह अन्य रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. तसेच काही लोकलच्या सेवा खोळंबल्या. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

logo
marathi.freepressjournal.in