धूर ओकणाऱ्या चिमण्या जमीनदोस्त

शास्‍त्रीय प्रक्रिया न करता सोडण्‍यात आलेल्‍या वायूमुळे मानवी आरोग्‍याला धोका पोहोचतो
धूर ओकणाऱ्या चिमण्या जमीनदोस्त
Published on

मुंबई : प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या काळबादेवीतील धूर ओकणाऱ्या चिमण्या जमीनदोस्त करण्यात आल्या. काळबादेवीतील सोने-चांदी व्यावसायिकांच्या भट्ट्यांवर कारवाई करण्यात आली. पालिकेच्या सी विभाग कार्यालयामार्फत ही कारवाई करण्यात आली असून, वायू प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिका अॅक्शन मोडमध्ये आली आहे.

काळबादेवीतील नागरी वस्‍तीत सोने चांदी वितळवणा-या भट्टींवर पालिकेच्या सी विभाग कार्यालय अंतर्गत इमारत व कारखाने विभागाने सक्त कारवाईचा बडगा उगारला आहे. या विभागातील धानजी मार्ग आणि मिझा मार्ग येथील सोने-चांदी वितळवणा-या व्‍यावसायिकांचे एकूण ४ धुराड्यावर कारवाई केली. सोने-चांदी वितळवण्यासाठी भट्टीचा वापर केला जातो. त्‍यातून निर्माण होणारा वायू चिमणीद्वारे हवेत सोडला जातो. शास्‍त्रीय प्रक्रिया न करता सोडण्‍यात आलेल्‍या वायूमुळे मानवी आरोग्‍याला धोका पोहोचतो. या घातक वायूमुळे प्रदूषणात भर पडत असल्‍याने पालिकेने वायू प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गलाई व्‍यावसायिकांविरोधात सक्त कारवाई हाती घेतली आहे. या अंतर्गत चार भट्टी, धुराड्यावर कारवाई करण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in