मनसेच्या सरचिटणीस स्नेहल जाधव यांचा राजीनामा; शिंदे गटात करणार प्रवेश?
मनसेच्या सरचिटणीस स्नेहल जाधव यांचा राजीनामा; शिंदे गटात करणार प्रवेश?

मनसेच्या सरचिटणीस स्नेहल जाधव यांचा राजीनामा; शिंदे गटात करणार प्रवेश?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) मुंबईत मोठा राजकीय धक्का बसला असून पक्षाच्या सरचिटणीस स्नेहल जाधव यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व जबाबदाऱ्यांचा राजीनामा दिला आहे. वॉर्ड क्रमांक १९२ मधील उमेदवारी जाहीर करताना आपल्याला विश्वासात न घेतल्याने त्या नाराज असल्याचे समजते.
Published on

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) मुंबईत मोठा राजकीय धक्का बसला असून पक्षाच्या सरचिटणीस स्नेहल जाधव यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व जबाबदाऱ्यांचा राजीनामा दिला आहे. वॉर्ड क्रमांक १९२ मधील उमेदवारी जाहीर करताना आपल्याला विश्वासात न घेतल्याने त्या नाराज असल्याचे समजते.

स्नेहल जाधव यांनी १९९२ ते १९९७, १९९७ ते २००२ आणि २००२ ते २००७ या कालावधीत सलग तीन वेळा नगरसेविका म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. त्यानंतर २००७ ते २०१२ या काळात त्यांच्या पतींची नगरसेवक म्हणून निवड झाली होती. वॉर्ड क्रमांक १९२ मधून कुटुंबाने सलग चार वेळा नगरसेवकपदाची निवडणूक जिंकूनही यावेळी मनसेकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, स्नेहल जाधव या आपल्या समर्थक व कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची शक्यता असून त्या शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या घडामोडींमुळे वॉर्ड क्रमांक १९२ सह मुंबईतील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in