मुंबई : मलबार हिल पोलिसांनी ५ आणि ६ मार्च रोजी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या (व्हीआयपी) उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व गृहनिर्माण सोसायट्या आणि मालकांना त्यांच्या इमारतींच्या टेरेसवर स्नायपर (शार्प शूटर्स) तैनात करण्याची परवानगी देण्यास सांगितले आहे.
अतिमहत्त्वाच्या व्यक्ती (व्हीआयपी) सहसा सह्याद्री अतिथीगृह किंवा राजभवनात राहतात. पण यापूर्वी कधीही शार्पशूटर्सना स्थान देण्याची अशी विनंती करण्यात आलेली नाही. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यासाठी कडेकोट सुरक्षेची तयारी करण्यात आली आहे.