आतापर्यंत या खासदार,आमदारांनी दिले राजीनामे ; मराठा आरक्षणसाठी सोडलं पद...

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अनेक राजकीय पक्षांना देखील चांगलच फटका बसला आहे
आतापर्यंत या खासदार,आमदारांनी दिले राजीनामे ; मराठा आरक्षणसाठी सोडलं पद...

राज्यता मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. अंतरवली सराटी इथं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. संपूर्ण राज्यातून जरांगे यांना उपोषणाला पाठींबा आहे. राज्यात ठिकठिकाणी साखळी उपोषण , मोर्चे , प्रचार सुरु आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देत महाराष्ट्रातील अनेक आमदार व खासदारांनी राजीनामा दिला आहे. नाशिक तसेच हिंगोली येथील शिवसेनेच्या काही खासदारांनी राजीनामे दिले आहेत. तसचं आता एका आमदारान देखील राजीनामा दिला आहे.

हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी सोमवारी नवी दिल्लीतील लोकसभा सचिवालयात राजीनामा दिला होता आणि नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. काँग्रेसचे परभणीतील आमदार सुरेश वरपूडकर यांनी देखील आमदारकीचा राजीनामा दिला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अनेक राजकीय पक्षांना देखील चांगलच फटका बसला आहे .यामुळे सरकारसमोर देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

आतापर्यंत या आमदार-खासदारनी दिला राजीनामा

-सुरेश वरपूडकर - काँग्रेस आमदार

-अतुल बेनके - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

-हेमंतल गोडसे, हेमंत पाटील - शिंदे गट खासदार

-रमेश बोरनारे - शिंदे गट आमदार

-लक्ष्मण पवार - भाजप

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in