म्हणुन जीडब्ल्यूएमने भारतातील व्यवसाय बंद करण्याचा घेतला निर्णय

म्हणुन जीडब्ल्यूएमने भारतातील व्यवसाय बंद करण्याचा घेतला निर्णय

जीडब्ल्यूएमच्या भारतातील व्यवसाय बंद करण्याच्या निर्णयामुळे जवळपास ८ हजार कोटींचा बांधकाम प्रकल्प बंद होईल

ग्रेट वॉल मोटर (जीडब्ल्यूएम)या चीनच्या सर्वात मोठी एसयूव्ही निर्माती कंपनीने २०२२ ऑटो एक्सपोमध्ये भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारचे प्रदर्शन केले होते. या ईव्हीच्या सादरीकरणासह, कंपनी भारतात विस्तार करण्याचा विचार करत होती. कंपनीने प्रीमियम मध्यम आकाराच्या एसयूव्ही हवाल एफ७ ने आपला प्रवास सुरू केला. त्यावेळी कोविड१९ महामारी आणि भारत आणि चीन यांच्या सीमेवरील संबंधांमुळे अडीच वर्षानंतरही एफडीआयला मंजुरी न मिळाल्याने जीडब्ल्यूएमने भारातील व्यवसाया बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

जीडब्ल्यूएमच्या भारतातील व्यवसाय बंद करण्याच्या निर्णयामुळे जवळपास ८ हजार कोटींचा बांधकाम प्रकल्प बंद होईल, ज्यामध्ये तळेगाव, पुणे येथे जनरल मोटर्स प्लांट उभारण्याची आणि हजारो नोकऱ्या निर्माण करण्याच्या योजनांचा समावेश आहे.

चिनी उत्पादनांची भारतीय बाजारपेठ ही तशी सकारात्मक प्रतिमा नाही. चिनी उत्पादने स्वस्त असली तरी ते त्यांच्या लवकर खराब होतात हा लोकांचा अनुभव आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in