"...तर मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांनी दौराच रद्द केला", आदित्य ठाकरेंचा पुन्हा हल्ला बोल

राज्यात घटनाबाह्य सरकार बसलंय. ६ हजार कोटींचा रस्ते घोटाळा लोकायुक्तांकडे नेणार आहोत
"...तर मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांनी दौराच रद्द केला",  आदित्य ठाकरेंचा पुन्हा हल्ला बोल

एकनाथ शिंदे यांनी बंडोखोरी करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेल्यानंतर ठाकरे गटाकडून त्यांच्यावर सातत्याने टीका केली जाते. यात ठाकरे गटाचे संजय राऊत आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे हे आघाडीवर असतात. आता आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे सरकारव हल्ला चढवला आहे.

मुख्यमंत्री आणि मंत्री जनतेच्या पैशावर परदेश दौरे करत आहेत. पण त्याठिकाणी जाऊन ते नेमकं करणार काय आहेत? ते कोणाला भेटणार आहेत? कुठल्या कंपन्यांच्या भेटी घेणार आहेत? याबाबत काहीही माहिती नाही. ते या दौऱ्यांना सुट्टया समजायला लागले का? अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. माझ्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यासह मंत्र्यांनी दोन दौरे रद्द केले, यह डह अच्छा है, असा टोला देखील आदित्य यांनी यावेळी लगावला.

नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे ?

राज्यात घटनाबाह्य सरकार बसलंय. ६ हजार कोटींचा रस्ते घोटाळा लोकायुक्तांकडे नेणार आहोत. स्ट्रीट फर्निचर घोटाळासुद्धा नेणार आहोत. मुख्यमंत्री हे टेंडर शोधत असतात. सरकारमधील अनेकांना फॉरेन ट्रिप करायला आवडतात. दौऱ्यांना हे सुट्टी समजायला लागले आहेत. या दौऱ्यातून निघतं काय? मुख्यमंत्र्याचा जर्मनी लंडनला दौरा निघाला होता. ते जर्मनीला हायवे बघायला जाणार होते. तेथे जाऊन तुम्ही करणार काय? असा प्रश्न मी विचारला. डाओसमध्ये आम्ही काय केलं ते सगळं समोर आणलं होतं. मुख्यमंत्री नेमकं परदेशात जाऊन करणार काय? असा प्रश्न विचारताच त्यांनी ३० मिनीटात त्यांनी दौरा रद्द केला. यह डर अच्छा है, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर देखील घाणाला जाणार आहेत. मात्र, इकडे आमदार अपात्रता प्रकरण रखडवून तुम्ही संसदीय लोकशाहीची हत्या करताय. सुप्रीम कोर्टाने मे महिन्यात निकाल दिला होता. त्याला चार महिने झाले. तेव्हापासून निकाल पुढे ढकलला जात आहे. तुम्ही जाऊ नका, राज्याची बदनामी करु नका, अशी विनंती मी अध्यक्षांना केली. त्यांनंतर त्यांचा दौरा रद्द करण्यात आला असा दावा आदित्य यांनी केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in