मुंबई : अध्यक्षाने सदस्याचा दाताने अंगठाच तोडला; सोसायटीच्या बैठकीतील धक्कादायक घटना

मुंबई : अध्यक्षाने सदस्याचा दाताने अंगठाच तोडला; सोसायटीच्या बैठकीतील धक्कादायक घटना

दहिसर येथे एका गृहनिर्माण सोसायटीच्या बैठकीत अध्यक्षाने सदस्याचा अंगठाच दाताने तोडला. या घटनेने मुंबईत खळबळ माजली आहे.
Published on

मुंबई : सहकारी सोसायट्यांच्या बैठकीत कायमच वादविवाद, हमरीतुमरी होत असते. छोट्याशा किंवा मोठ्या कारणांवरून सदस्य एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. दहिसर येथे एका गृहनिर्माण सोसायटीच्या बैठकीत अध्यक्षाने सदस्याचा अंगठाच दाताने तोडला. या घटनेने मुंबईत खळबळ माजली आहे.

दहिसर येथील म्हात्रेवाडीतील अमरनाथ सहकारी सोसायटीच्या अध्यक्षाकडून बैठक आयोजित केली होती. या बैठकीला अध्यक्षांसह सदस्यांची उपस्थिती होती. यावेळी, सोयायटी सदस्य आदित्य देसाई आणि सोसायटी अध्यक्ष नित्यानंद परिहार यांच्यात काही कारणावरुन वाद झाला. यावेळी झालेल्या हाणामारीत अध्यक्ष नित्यानंद परिहार यांनी चक्क दाताने सदस्य आदित्य यांचा अंगठा चावला.

हा अंगठा या घटनेमुळे तुटून पडला, असा आरोप आदित्य देसाई यांनी केला आहे. या घटनेनंतर आदित्य देसाई यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. देसाई यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in