गो ग्रीन, गो क्लीन’ उपक्रमांतर्गत मुंबई मेट्रो वनने बसवले सौरपॅनेल

गो ग्रीन, गो क्लीन’ उपक्रमांतर्गत मुंबई मेट्रो वनने  बसवले सौरपॅनेल

गो ग्रीन, गो क्लीन’ उपक्रमांतर्गत मुंबई मेट्रो वनने आठ हजार ९८७ सौरपॅनेल बसवले आहेत. त्यातून मिळणारी ऊर्जा स्थानकांवरील प्रकाश, लिफ्ट, एस्केलेटर, पंप इत्यादींसाठी वापरण्यात येत आहे. सौरपॅनेल बसवण्यात आल्यापासून कार्बन उत्सर्जन जवळपास १८,००० टनांनी कमी होण्यास मदत झाल्याचे मेट्रो प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

२०१७ मध्ये सर्व १२ स्थानकांवर सौरपॅनेल बसवण्याचा प्रकल्प राबवण्यात आला. यानंतर २०१८ मध्ये डेपोवरदेखील हा प्रकल्प राबवण्यात आला. तेव्हापासून २० कोटी रुपयांची सुमारे २० दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. महिन्याला सुमारे २४ लाख युनिट विजेची गरज असून, त्यातील चार लाख युनिट सौरऊर्जेद्वारे भागवली जातात. याचा अर्थ, मुंबई मेट्रो वन सौरऊर्जेच्या एकूण गरजेपैकी १५ टक्के गरजेची पूर्तता करते, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, मुंबई मेट्रो वनद्वारे सौरऊर्जेच्या ४,००,००० युनिट्सपैकी १२ स्थानकांमधून ३,३०,००० युनिट्स आणि डेपोच्या छतावरून ७०,००० युनिट्सची निर्मिती केली जात आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in