वांद्रे-हरिद्वार एक्सप्रेसमध्ये आत्महत्या केलेल्या मुलाची ओळख पटली ;शवविच्छेदनानंतर मृतदेह पित्याच्या स्वाधीन

संबंधित कुटुंबिय दिल्लीतील रहिवासी असून त्यांचा मुलगा मुंबईत आला होता. त्याच्या आत्महत्येबाबत त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही
वांद्रे-हरिद्वार एक्सप्रेसमध्ये आत्महत्या केलेल्या मुलाची ओळख पटली ;शवविच्छेदनानंतर मृतदेह पित्याच्या स्वाधीन

मुंबई : रविवारी रात्री उशिरा वांद्रे-हरिद्वार एक्सप्रेसमध्ये गळफास लावून आत्महत्या केलेल्या १४ वर्षांच्या मुलाची ओळख पटविण्यात रेल्वे पोलिसांना यश आले असून त्याचे नाव मोहम्मद आमीर असल्याचे उघडकीस आले आहे. शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह त्याच्या पित्याच्या स्वाधीन करण्यात आला आहे. त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही. त्यामुळे वांद्रे पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे.

रविवारी रात्री नऊ वाजता वांद्रे रेल्वे टर्मिनस स्थानकात उभ्या असलेल्या वांद्रे-हरिद्वार एक्सप्रेसमधील बोगी क्रमांक एस सात येथे एका १४ वर्षांच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या मुलाची ओळख पटली नव्हती. त्यामुळे त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला होता. त्याची ओळख पटावी, यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले होते. याचदरम्यान या मुलाने कचरा वेचणारा इसमाच्या मोबाईलवरून कोणाला तरी कॉल केल्याचे समजले होते. ही माहिती मिळताच पोलिसांनी या क्रमांकावरून त्याच्या वडिलांना संपर्क साधून त्यांना मुंबईत बोलावून घेतले होते. त्याचा मृतदेह दाखविल्यानंतर तो त्यांचाच मुलगा असल्याचे उघडकीस आले.

संबंधित कुटुंबिय दिल्लीतील रहिवासी असून त्यांचा मुलगा मुंबईत आला होता. त्याच्या आत्महत्येबाबत त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही. त्यामुळे त्यांची जबानी नोंदवून त्याचा मृतदेह त्यांच्या स्वाधीन करण्यात आला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in