लवकरच उच्च न्यायालयात जाणार- गुणरत्न सदावर्ते

ओबीसी आणि खुल्या वर्गातील लोकांना मला एक सांगायचे आहे की तुमच्या संवैधानिक अधिकारांच्या रक्षणासाठी मी आहे.
लवकरच उच्च न्यायालयात जाणार- गुणरत्न सदावर्ते

मुंबई : मराठा समाजाला ईडब्ल्यूएसपासून वंचित करण्यासाठी उभारलेले हे आंदोलन होते. या विरोधात आपण उच्च न्यायालयात लवकरात लवकर जाणार असल्याचे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी स्पष्ट केले आहे.

ओबीसी आणि खुल्या वर्गातील लोकांना मला एक सांगायचे आहे की तुमच्या संवैधानिक अधिकारांच्या रक्षणासाठी मी आहे. कायदयात व्हॅलिडिटी असते. अशा प्रकारच्या बॅकडोअर एण्ट्रीची कायद्यात तरतूद नाही. सरकार असो वा जरांगे असोत हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत. ३७ लाख प्रमाणपत्रे वाटण्यात आले सांगतात ३ हजार ७०० प्रमाणपत्रही वाटली जाउ शकत नाहीत. स्टंटबाज आंदोलकांवर जास्त बोलून वेळ घालविण्यासारखे मला वाटत नाही. जरांगे कोणत्या लॉ कॉलेजमध्ये पास झाले कोणत्या कॉलेजमधून पास झाले, असा सवाल सदावर्ते यांनी केला. विनोद पाटील, दत्ताभाऊ पाथ्रीकर यांच्यासारख्यांनी बोलले तर समजू शकतो. पण जरांगे बोलतात तर टीआरपी मिळतो, असा टोलाही त्यांनी लगावला. आजच्या जीआरमध्ये नवीन काहीच नाही. सगेसोयरे हे आधीपासूनच आहे. रक्ताचे नातेवाईक याचा अंतर्भाव आधीपासूनच आहे. काहीच नवीन नाही सगळे जुनेच आहे. ओपनमधील, ओबीसीमधील लोकांनी कोणी चिंता करू नये जागा कमी होउ देणार नाही. जे खुल्या वर्गातील आहेत त्यांच्या अधिकाराच्या जागा शाबूत ठेवणे त्यावर गदा न येऊ देणे, ही माझी जबाबदारी आहे.

logo
marathi.freepressjournal.in