साथीचे आजार रोखण्यासाठी पालिकेची जी उत्तर विभागात विशेष मोहीम

धारावीत सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली असता या सर्वेक्षणामध्ये एकूण ३७७१ घरांमध्ये तापाचे १२ रुग्ण आढळले
 साथीचे आजार रोखण्यासाठी पालिकेची जी उत्तर विभागात विशेष मोहीम

स्वाईन फ्ल्यू, मलेरिया, डेंग्यू आदी साथीच्या आजारांचा झपाट्याने प्रसार होत आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत साथीचे आजार रोखण्यासाठी पालिकेच्या जी उत्तर विभागाने आरोग्य विभागाच्या माध्यमातून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. धारावीत सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली असता या सर्वेक्षणामध्ये एकूण ३७७१ घरांमध्ये तापाचे १२ रुग्ण आढळले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आल्याचे जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त प्रकाश सपकाळे यांनी सांगितले.

धारावीत एकूण १३ पावसाळी विशेष आरोग्य शिबिरे भरवण्यात आली. या आरोग्य शिविरांमध्ये मलेरिया, लेप्टो, डेंगू, कावीळ, गॅस्ट्रो अशा पावसाळी आजारांच्या २३६१ रुग्णांवर उपचार करण्यात आले. तसेच परिसरात पावसाळी आजारांबद्दल विशेष वाहनांमार्फत जनजागृती करण्यात येत आहे.

जुलै महिन्यामध्ये धारावीतील ५ आरोग्य केंद्रांमध्ये अतिसंवेदनशील भागामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन पावसाळी आजारांस प्रतिबंध करण्यासाठी काम करण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in