Mumbai Metro: गणेशोत्सवानिमित्त मेट्रोच्या विशेष वाढीव फेऱ्या

गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मेट्रोच्या रात्रीच्या वेळेत अधिक फेऱ्या होणार आहेत.
Mumbai Metro: गणेशोत्सवानिमित्त मेट्रोच्या विशेष वाढीव फेऱ्या
(संग्रहित छायाचित्र)
Published on

मुंबई : गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मेट्रोच्या रात्रीच्या वेळेत अधिक फेऱ्या होणार आहेत. १७ सप्टेंबरपर्यंंत अंधेरी (पश्चिम) आणि गुंदवली या दोन्ही टर्मिनलवरून शेवटची मेट्रो रात्री ११ ऐवजी रात्री ११.३० वाजता सुटेल.

मेट्रोच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एमएमआरडीएला केली होती.

याबद्दल मंत्री लोढा म्हणाले, मुंबई शहरातील सार्वजनिक उत्सव मंडळांचे देखावे पाहण्यासाठी भक्त रात्री उशिरापर्यंत प्रवास करतात. २४ तास सुरू असलेल्या मुंबईमध्ये भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून मेट्रो सेवेच्या वेळेत आणि फेऱ्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. वाढीव फेऱ्यांमुळे गर्दी विभागली जाऊन सुव्यवस्था राखली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अंधेरी (पश्चिम) आणि गुंदवली टर्मिनलवरून शेवटच्या ट्रेनची वेळ ३० मिनिटांनी वाढवण्यात येणार आहे. दोन्ही टर्मिनलवरून अतिरिक्त मेट्रो ट्रेन रात्री ११.१५ आणि ११.३० वाजता सुटतील. गुंदवली ते दहिसर (पूर्व) आणि अंधेरी (पश्चिम) ते दहिसर (पूर्व) या स्थानकांदरम्यान चार वाढीव फेऱ्या सुरू केल्या जातील. विस्तारामुळे प्रमुख स्थानकांवर एकूण २० अतिरिक्त फेऱ्या चालवल्या जातील.

Mumbai Metro: गणेशोत्सवानिमित्त मेट्रोच्या विशेष वाढीव फेऱ्या
नवशक्ति-FPJ इको गणेश: पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा आणि जिंका मोठी बक्षिसे

अशा असतील वाढीव फेऱ्या :

  • गुंदवली ते अंधेरी (पश्चिम) : रात्री १०:२०, १०:३९, १०:५० आणि ११ वाजता (४ सेवा)

  • अंधेरी (पश्चिम) ते गुंदवली : रात्री १०:२०, १०:४०, १०:५० आणि ११ वाजता ( ४ सेवा)

  • गुंदवली ते दहिसर (पूर्व) : रात्री ११:१५ आणि ११:३० वाजता (२ सेवा)

  • अंधेरी पश्चिम ते दहिसर (पूर्व) : रात्री ११:१५ आणि ११:३० वाजता (२ सेवा)

  • दहिसर (पूर्व) ते अंधेरी पश्चिम : रात्री १०:५३, ११:१२, ११:२२ आणि ११:३३ वाजता (४ सेवा)

  • दहिसर (पूर्व) ते गुंदवली : रात्री १०:५७, ११:१७, ११:२७ आणि ११:३६ वाजता (४ सेवा)

logo
marathi.freepressjournal.in